आमच्याबद्दल

शाश्वत विकासाच्या दिशेने, गावातील प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून

2000+
नागरिक
50+
वर्षांचा इतिहास
100%
डिजिटल सेवांचे
24/7
सेवा उपलब्ध
प्रस्तावना

सविनय नमस्कार,

जयरामनाईक तांडा हे गाव पूर्वी जेमलानाईक तांडा या नावाने ओळखले जात होते आणि याच नावाने सन १९९३ मध्ये गावाला महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाला. सुमारे सन १९०५ च्या आसपास तोळा नाईक भीमा नाईक राठोड यांच्या पोटी जन्मलेले जेमला नाईक हे कर्तृत्ववान, प्रभावी आणि समाजहितदक्ष व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ तांडावासी व ग्रामस्थांच्या एकमताने गावास जेमलानाईक तांडा असे नाव देण्यात आले. जेमला नाईक यांनी निपाणी जवळका येथे भरणारा आठवडी बाजार पाचेगाव परिसरासाठी उपलब्ध करून दिला, हा गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरला. कालांतराने जिल्हा परिषद शाळेच्या मंजुरीपासून हे गाव जयराम तांडा या नावाने अधिक प्रसिद्ध झाले.

सन १८७५ च्या सुमारास वडाचीवाडी येथे गवळ्यांची सुमारे दहा घरांची वस्ती होती. पुढे विविध कारणांमुळे ही वस्ती स्थलांतरित होऊन याच परिसरात जेमला नाईक तांडा स्थायिक झाला. याच काळात बंजारा समाजाची सुमारे पंधरा कुटुंबे येथे स्थिरावली. भीमा नाईक राठोड हे आपल्या पाच मुलांसह – दगडू, तेजा, आनंदा, तोळा व रोडा – भोगलवाडी, भवानवाडी मार्गे वडाचीवाडी परिसरात आले. त्यांच्या सोबतच चव्हाण, पवार, जाधव, आडे तसेच भुकिया राठोड, राळावाळा राठोड, इस्ळावत पवार, नुळसावत पवार, वढत्या जाधव, मूड चव्हाण, बाळोत व पाटोळे कुटुंबांनी गावाच्या सामाजिक रचनेची पायाभरणी केली. पुढील काळात फुलचंद कारभारी, चेअरमन धोंडीराम राठोड, घडीवाले धोंडीराम हरसिंग राठोड व लालू राठोड यांच्यासह अनेकांनी आपापल्या कार्यातून गावाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. वालचंद अरूणानाईक राठोड यांनी न्यायदानाचे उत्तम कार्य केल्याचा वारसा आहे.

माळकरी संप्रदायाचा आध्यात्मिक वारसा देविदास हेमला राठोड, जनार्दन किसनराव पवार, नामदेव जयसिंग चव्हाण, दामोदर जयसिंग चव्हाण, बन्सी राठोड, गणपत राठोड, कनिराम अनारचंद राठोड, पांडुरंग जेमला राठोड,मिठू हरी राठोड, मानसिंग शाहू राठोड, गोपीनाथ रामदास पवार, फुलचंद जयराम पवार, धोंडीराम लालू राठोड, डॉ.बन्सीलाल लोभाजी राठोड.कोंडीराम राठोड, देविदास किसनराव पवार, किसान मुन्ना चव्हाण, गोपीनाथ ताराचंद राठोड, बन्सी सिताराम जाधव यांनी जपला; तर सध्या संताराम महाराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर व पैठण पायी दिंडी, अमावास्येची पंगत व धार्मिक उपक्रम अखंड सुरू आहेत. कुस्ती क्षेत्रातही रामा बालचंद राठोड, मानसिंग शाहु राठोड व दलसिंग शाहु राठोड यांनी १९३० ते १९८० या काळात, तर बबन दिना राठोड यांनी १९९१ ते २००० दरम्यान गौरवशाली परंपरा पुढे नेली. शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने सन १९७३ मध्ये जिल्हा परिषद शाळेला जयराम तांडा या नावाने मंजुरी मिळाली. खर्चे गुरुजी, सानप सर, देवकुळ गुरुजी व पवार सर यांच्या ज्ञानदानामुळे गावाच्या प्रगतीला दिशा मिळाली. प्रशासकीय दृष्ट्या सन २०१६ मध्ये गावास जयराम नाईक तांडा ग्रामपंचायत म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आणि प्रथम महिला सरपंच सौ. अनुसया देविदास पवार यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे रस्ते व पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या. गावास समृद्ध धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असून हनुमान मंदिर, कानिफनाथ मंदिर, बहिरोबा मंदिर, साई मंदिर, आईभाया व जगदंबा देवीची मंदिरे श्रद्धास्थान आहेत. अखंड भागवत सप्ताह, संत सेवालाल महाराज जयंती, होळी, सार्वजनिक पंगती असे उपक्रम नियमितपणे साजरे होतात.तसेच रामनवमीच्या दिवशी साईबाबांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो, या ठिकाणी जत्रा भरत असते. सन १९६४ पासून वैशाख शुद्ध पंचमीच्या मुहूर्तावर जेमला नाईक यांनी अखंड भागवत सप्ताहाची प्रथम सुरुवात केली व १९७५ पर्यंत चालवला पुढे १९७५ पासून ते १९९१ पर्यंत जनार्धन किसनरावजी पवार साहेबांनी भागवत सप्ताह व जयराम तांड्याचा आध्यात्मिक वारसा समर्थपणे चालवला व सामाजिक ऐक्य घडवून आणले. सध्याचे सरपंच श्री. विष्णू रामभाऊ राठोड यांच्या कुशल नेतृत्वाखाली जलसंधारण, आरोग्य शिबिरे, रस्ते सुधारणा, विद्युत खांब स्थानांतर यामुळे गाव दुष्काळमुक्त, तंटामुक्त व आरोग्यसंपन्न झाले आहे. पाझर तलाव व ४ किमी. नदी खोलीकरण केल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात शेती करणे शक्य होत आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमची दूर झाली . रेशीम उद्योग, पशुपालन व कुक्कुटपालनास प्रोत्साहन देत ग्रामपंचायत युवकांसाठी सदैव तत्परतेने कार्य करीत आहे.

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

गावातील जलसंधारणाची कामे - पाणीदार सरपंच

गावातील जलसंधारणाची कामे - पाणीदार सरपंच

शेतकरी सहल

शेतकरी सहल

गावात आयोजित केलेले आरोग्य शिबिर

गावात आयोजित केलेले आरोग्य शिबिर

आमचे ध्येय आणि ध्येयवाद

दृष्टी

Vision

ला एक आदर्श ग्राम म्हणून विकसित करणे जिथे प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावले जाईल, शैक्षणिक, आरोग्य आणि आर्थिक विकास साधला जाईल आणि गावाची परंपरा आणि संस्कृती जपली जाईल.

उद्देश

Mission

पारदर्शक आणि नागरिक केंद्रित प्रशासन राबवणे, डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे.

आमचे मूल्ये

आमच्या कार्याचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक तत्त्वे

पारदर्शकता

सर्व निर्णय आणि कार्यवाही पारदर्शक आणि जबाबदार

नागरिक केंद्रित

नागरिकांच्या गरजा आणि हितसंबंध प्रथम

नावीन्य

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नावीन्यपूर्ण उपाय

सेवाभाव

नागरिक सेवेसाठी समर्पित आणि कटिबद्ध

आमची कामगिरी

गेल्या वर्षात आम्ही साध्य केलेले महत्त्वाचे उद्दिष्टे आणि उपलब्धी

100% डिजिटल सेवांचे

सर्व नागरिकांना ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या

95% शिक्षण दर

गावातील मुलांची शिक्षणाची गुणवत्ता सुधारली

स्वच्छ गाव पुरस्कार

राज्यस्तरीय स्वच्छता स्पर्धेत प्रथम क्रमांक

संपर्क केंद्र

जयराम तांडा ग्रामपंचायत

ग्राम विकासात आपले सहकार्य आणि सूचना अपेक्षित आहेत. प्रत्येक ग्रामस्थाचे विचार आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.

पत्ता

जयराम तांडा, ता. गेवराई जि. बीड, महाराष्ट्र

दूरध्वनी

+91 9921011028

ईमेल

vishnu51176@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार : सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00

आमचे स्थान

जयराम तांडा, ता. गेवराई जि. बीड

संदेश पाठवा

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या