जयराम तांडा
जयराम तांडा ग्रामपंचायत आज तंटामुक्त, जलसमृद्ध आणि आरोग्यसंपन्न गाव म्हणून ओळखली जाते. सरपंच श्री. विष्णू रामभाऊ राठोड "पाणीदार सरपंच" म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची विचारधारा "राजकारण कमी, समाजकारण जास्त" आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याचे अतिक्रमण काढले, विद्युत खांबांचे स्थानांतर एका दिवसात केले आणि पाझर तलाव व नदीचे खोलीकरण करून गाव दुष्काळमुक्त केले. शेतकऱ्यांना आता वर्षभर शेती शक्य झाली आहे. कोविड-१९ काळात स्वखर्चाने लसीकरण केले. २५ पेक्षा जास्त आरोग्य शिबिरे आयोजित केली. पशुधनासाठी लसीकरण शिबिरे घेऊन लंपीवर नियंत्रण मिळवले. ३० शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग सुरू केला. पशुपालन, कुक्कुटपालनासाठी युवकांना प्रोत्साहन दिले. "सर्वांना विचारून चालणे" हे त्यांचे वैशिष्ट्य असून सर्व सहकाऱ्यांसोबत गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचे ध्येय आहे.
ग्रामपंचायत डिजिटल सेवा
ऑनलाइन अर्ज, दस्तऐवज आणि सेवा
सविनय नमस्कार,
जयरामनाईक तांडा हे गाव पूर्वी जेमलानाईक तांडा या नावाने ओळखले जात होते आणि याच नावाने सन १९९३ मध्ये गावाला महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाला. सुमारे सन १९०५ च्या आसपास तोळा नाईक भीमा नाईक राठोड यांच्या पोटी जन्मलेले जेमला नाईक हे कर्तृत्ववान, प्रभावी आणि समाजहितदक्ष व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ तांडावासी व ग्रामस्थांच्या एकमताने गावास जेमलानाईक तांडा असे नाव देण्यात आले. जेमला नाईक यांनी निपाणी जवळका येथे भरणारा आठवडी बाजार पाचेगाव परिसरासाठी उपलब्ध करून दिला, हा गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरला. कालांतराने जिल्हा परिषद शाळेच्या मंजुरीपासून हे गाव जयराम तांडा या नावाने अधिक प्रसिद्ध झाले.
सन १८७५ च्या सुमारास वडाचीवाडी येथे गवळ्यांची सुमारे दहा घरांची वस्ती होती. पुढे विविध कारणांमुळे ही वस्ती स्थलांतरित होऊन याच परिसरात जेमला नाईक तांडा स्थायिक झाला. याच काळात बंजारा समाजाची सुमारे पंधरा कुटुंबे येथे स्थिरावली. भीमा नाईक राठोड हे आपल्या पाच मुलांसह – दगडू, तेजा, आनंदा, तोळा व रोडा – भोगलवाडी, भवानवाडी मार्गे वडाचीवाडी परिसरात आले. त्यांच्या सोबतच चव्हाण, पवार, जाधव, आडे तसेच भुकिया राठोड, राळावाळा राठोड, इस्ळावत पवार, नुळसावत पवार, वढत्या जाधव, मूड चव्हाण, बाळोत व पाटोळे कुटुंबांनी गावाच्या सामाजिक रचनेची पायाभरणी केली. पुढील काळात फुलचंद कारभारी, चेअरमन धोंडीराम राठोड, घडीवाले धोंडीराम हरसिंग राठोड व लालू राठोड यांच्यासह अनेकांनी आपापल्या कार्यातून गावाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. वालचंद अरूणानाईक राठोड यांनी न्यायदानाचे उत्तम कार्य केल्याचा वारसा आहे.
माळकरी संप्रदायाचा आध्यात्मिक वारसा देविदास हेमला राठोड, जनार्दन किसनराव पवार, नामदेव जयसिंग चव्हाण, दामोदर जयसिंग चव्हाण, बन्सी राठोड, गणपत राठोड, कनिराम अनारचंद राठोड, पांडुरंग जेमला राठोड,मिठू हरी राठोड, मानसिंग शाहू राठोड, गोपीनाथ रामदास पवार, फुलचंद जयराम पवार, धोंडीराम लालू राठोड, डॉ.बन्सीलाल लोभाजी राठोड.कोंडीराम राठोड, देविदास किसनराव पवार, किसान मुन्ना चव्हाण, गोपीनाथ ताराचंद राठोड, बन्सी सिताराम जाधव यांनी जपला; तर सध्या संताराम महाराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर व पैठण पायी दिंडी, अमावास्येची पंगत व धार्मिक उपक्रम अखंड सुरू आहेत. कुस्ती क्षेत्रातही रामा बालचंद राठोड, मानसिंग शाहु राठोड व दलसिंग शाहु राठोड यांनी १९३० ते १९८० या काळात, तर बबन दिना राठोड यांनी १९९१ ते २००० दरम्यान गौरवशाली परंपरा पुढे नेली. शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने सन १९७३ मध्ये जिल्हा परिषद शाळेला जयराम तांडा या नावाने मंजुरी मिळाली. खर्चे गुरुजी, सानप सर, देवकुळ गुरुजी व पवार सर यांच्या ज्ञानदानामुळे गावाच्या प्रगतीला दिशा मिळाली. प्रशासकीय दृष्ट्या सन २०१६ मध्ये गावास जयराम नाईक तांडा ग्रामपंचायत म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आणि प्रथम महिला सरपंच सौ. अनुसया देविदास पवार यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे रस्ते व पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या. गावास समृद्ध धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असून हनुमान मंदिर, कानिफनाथ मंदिर, बहिरोबा मंदिर, साई मंदिर, आईभाया व जगदंबा देवीची मंदिरे श्रद्धास्थान आहेत. अखंड भागवत सप्ताह, संत सेवालाल महाराज जयंती, होळी, सार्वजनिक पंगती असे उपक्रम नियमितपणे साजरे होतात.तसेच रामनवमीच्या दिवशी साईबाबांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो, या ठिकाणी जत्रा भरत असते. सन १९६४ पासून वैशाख शुद्ध पंचमीच्या मुहूर्तावर जेमला नाईक यांनी अखंड भागवत सप्ताहाची प्रथम सुरुवात केली व १९७५ पर्यंत चालवला पुढे १९७५ पासून ते १९९१ पर्यंत जनार्धन किसनरावजी पवार साहेबांनी भागवत सप्ताह व जयराम तांड्याचा आध्यात्मिक वारसा समर्थपणे चालवला व सामाजिक ऐक्य घडवून आणले. सध्याचे सरपंच श्री. विष्णू रामभाऊ राठोड यांच्या कुशल नेतृत्वाखाली जलसंधारण, आरोग्य शिबिरे, रस्ते सुधारणा, विद्युत खांब स्थानांतर यामुळे गाव दुष्काळमुक्त, तंटामुक्त व आरोग्यसंपन्न झाले आहे. पाझर तलाव व ४ किमी. नदी खोलीकरण केल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात शेती करणे शक्य होत आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमची दूर झाली . रेशीम उद्योग, पशुपालन व कुक्कुटपालनास प्रोत्साहन देत ग्रामपंचायत युवकांसाठी सदैव तत्परतेने कार्य करीत आहे.
वृक्ष लागवड
गावातील जलसंधारणाची कामे - पाणीदार सरपंच
शेतकरी सहल
गावात आयोजित केलेले आरोग्य शिबिर
आमचे प्रशासकीय अधिकारी
श्री. श्रवण चव्हाण
ग्रामपंचायत अधिकारी
संपर्क माहिती
विभाग: ग्रामपंचायत
+91 9130914751
श्री विष्णू रामभाऊ राठोड
सरपंच
संपर्क माहिती
विभाग: ग्रामपंचायत
+91 99210 11028
vishnu51176@gmail.com
सौ भागुबाई कृष्णा जाधव
उपसरपंच
संपर्क माहिती
विभाग: ग्रामपंचायत
+91 8275386683
ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मंडळ
श्रीराम भानुदास राठोड
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
+91 9423757875
सौ. बायनाबाई सुंदर राठोड
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
पूजा आकाश राठोड
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
+91 9529621800
सौ. सिमा संजय राठोड
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
+91 8459366473
श्री प्रभू बालचंद आडे
सदस्य
संपर्क माहिती
सदस्य
+91 9011120949
श्री राहुल नामदेव राठोड
पाणीपुरवठा कर्मचारी
संपर्क माहिती
पाणीपुरवठा कर्मचारी
+91 9146782192
श्री प्रवीण बळीराम जाधव
संगणक परिचालक
संपर्क माहिती
संगणक परिचालक
+91 9112669790
श्री नारायण अशोक राठोड
ग्रामपंचायत कर्मचारी
संपर्क माहिती
ग्रामपंचायत कर्मचारी
+91 9011919210
कौशल्या फुलचंद चव्हाण
अंगणवाडी कर्मचारी
संपर्क माहिती
अंगणवाडी कर्मचारी
+91
सुभास धोंडीराम राठोड
ग्राम.रोजगार सेवक
संपर्क माहिती
ग्राम.रोजगार सेवक
+91 9422177575
गाव माहिती व आकडेवारी
आमच्या गावाची महत्वपूर्ण माहिती आणि विकासाचे आकडे
ग्रामपंचायत
जयराम तांडा
तालुका
गेवराई
जिल्हा
बीड
राज्य
महाराष्ट्र
१,५०१
एकूण लोकसंख्या
३२५
एकूण कुटुंबे
९८०
मतदार संख्या
९३.००%
साक्षरता दर
२०१६
स्थापना वर्ष
० हेक्टर
क्षेत्रफळ
१
शाळा
१
अंगणवाडी
१
आरोग्य केंद्र
४
धार्मिक स्थळे
६
पाणी स्रोत
२०
स्ट्रीट लाईट
१२
महिला बचत गट
०
शेतकरी गट
कार्यालय वेळ
.
ग्रामसभेची बैठक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते
सुविधा
- .
ग्रामपंचायतीच्या सूचना
नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा
ग्रामपंचायत फोटो गॅलरी
आमच्या गावातील विविध कार्यक्रम, उत्सव आणि विकास कार्यांचे चित्र
जयराम तांडा गावातील रस्त्याचे काम
ध्वजारोहण समारोह
महिलांची विशेष ग्रामसभा
नदी खोलीकरण कामाचा शुभारंभ
आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे
वृक्षारोपण उपक्रम - गाव पातळीवरील पर्यावरण संवर्धन मोहीम
गावामध्ये पर्यावरण संतुलन राखण्यासाठी व हरित गावाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वृक्षसंवर्धनाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच भविष्यातील पिढीसाठी स्वच्छ व आरोग्यदायी पर्यावरण निर्माण करणे हा होता.
आरोग्य तपासणी कॅम्प व आरोग्यविषयक उपक्रम
ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये आरोग्य तपासणी कॅम्प व विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचा मुख्य उद्देश गावकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करणे, आजारांचे लवकर निदान करणे तसेच आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.
गावांतर्गत स्वच्छता मोहीम
जयराम तांडा ग्रामपंचायतीच्या वतीने गावांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
संपर्क केंद्र
जयराम तांडा ग्रामपंचायत
ग्राम विकासात आपले सहकार्य आणि सूचना अपेक्षित आहेत. प्रत्येक ग्रामस्थाचे विचार आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.
पत्ता
जयराम तांडा, ता. गेवराई जि. बीड, महाराष्ट्र
दूरध्वनी
+91 9921011028
ईमेल
vishnu51176@gmail.com
कार्यालयीन वेळ
सोमवार ते शनिवार : सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00
आमचे स्थान
जयराम तांडा, ता. गेवराई जि. बीड
संदेश पाठवा
आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या